१. वार्षिक सभासद शुल्क (Yearly Membership fee) – (रक्कम रु ५००/-) :
या निधीद्वारे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध उत्सव कार्यक्रम, विशेष व्यक्तींचा सन्मान, विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस/ पारितोषिके इत्यादीसाठी करण्यात येईल.
२. कायम खास निधी (Donation)–(रक्कम रु १०१/- व अधिक) :
यामध्ये आश्रयदाते यांचेकडून आलेल्या व मंडळास 101 रुपयावरील मिळालेली देणगी याचा समावेश असेल. तसेच शिल्लक रकमेपैकी कार्यकारी मंडळांनी वर्ग करण्यास मान्यता दिलेल्या रकमेचा या निधीमध्ये समावेश असेल. या निधीची उभारणी मंडळाच्या आर्थिक स्थैर्यासाठी असल्यामुळे समाविष्ट केलेल्या रकमांच्या विनियोग महत्त्वाच्या कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही.
३. आजीव सभासद निधी (Life Membership Fund) –(रक्कम रु २५००/- व अधिक) :
या निधीमध्ये आजीव सभासद वर्गणीचा समावेश होईल. या रकमांची गुंतवणूक करुन त्यामधून येणार्या व्याजाचा विनियोग मंडळच्या नित्य व दैनंदिन खर्चासाठी करता येईल.
४. सशर्त देणगी निधी (Conditional Endowment Fund) - (रक्कम रु ५०००/- व अधिक) :
सशर्त देणग्यांच्या निधीमध्ये विशिष्ट अटींवर मिळालेल्या देणग्यांचा समावेश होईल. अशा प्रकारच्या देणग्या मंडळच्या ध्येय व उद्देशास धरुन असलेल्या कार्याकरिताच स्वीकारण्यात येतील. या निधीचा उपयोग ज्या कारणांसाठी अथवा उद्देशांसाठी देणग्या स्वीकारल्या असतील त्यासाठीच करण्यात येईल.