Web Banner

सारस्वत विकास मंडळचे सभासद होऊ इच्छिणा-यांच्या माहितीसाठी.


१) सारस्वत विकास मंडळाचे ध्येय व उद्देश :-

१.१ : सांगली जिल्ह्यातील सर्व सारस्वत कुटूंब व मंडळींचे संघटन व स्नेहसंवर्धन करणे.
१.२ : मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम, स्नेह-मेळावे आयोजित करणे.
१.३ : जिल्ह्यातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांची, कला – क्रीडा – शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उन्नती करण्यास सहाय्य करणे व कौतुक करणे.
१.४ : जिल्ह्यातील सारस्वत रहिवाशांची माहिती अद्ययावत ठेवणे व सभासद वाढीसाठी प्रयत्न करणे.
१.५ : ज्ञाती बांधवांसाठी असणारे विविध विषय, योजना, उपक्रम यांची माहिती देणे.

२) सभासदत्व :-

२.१ : सांगली जिल्ह्यातील सारस्वत ज्ञातीतील कोणत्याही सज्ञान स्त्री व पुरुष व्यक्तीला या मंडळाचे सभासद होता येईल, मात्र या व्यक्तीला मंडळाचे ध्येय व उद्देश मान्य असले पाहिजेत.
२.२ : सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस मंडळाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये सभासदत्वाचा अर्ज करावा लागेल. महिन्याच्या कोणत्याही दिवशी अर्ज करता येईल व त्या अर्जासोबत वार्षिक वर्गणी जमा करावी लागेल. संस्थेचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते 31 मार्च असे राहील. सभासदत्व दरवर्षी वार्षिक वर्गणी जमा करून नूतनीकरण करावे लागेल.
२.३ : सभासदत्वासाठी कार्यकारीणीची मान्यता मिळाल्यानंतर, या व्यक्तीला मंडळाचे सभासद म्हणून मान्यता मिळेल व त्याचे नाव सभासदत्वाच्या यादीत समाविष्ट केले जाईल.

३) कार्यकारी मंडळ :-

३.१ : मंडळच्या दैनंदिन कारभारासाठी 11 सभासदांची निवड दर पाच वर्षांनी केली जाईल.
३.२ : कार्यकारी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाधिकारी हे चार पदाधिकारी व सात सभासद असतील.
३.३ : कार्यकारी मंडळाच्या सभा वर्षातून दोनदा व आवश्यकतेनुसार घेण्यात येतील.

४) मंडळाच्या आर्थिक बाबी :-

४.१ : वर्गणी देणगी व इतर जमा रकमा या सर्व सारस्वत को-ऑप. बँक, गावभाग शाखा, सांगली येथे जमा करण्यात येतील.
४.२ : सभासद वर्गणी देणगी व अन्य प्राप्त रक्कम ही बँकेत मुदत ठेवीत ठेवल्या जातील व त्यावरील येणाऱ्या व्याजातून कार्यक्रमाचा खर्च व अन्य आवश्यक खर्च केला जाईल.
४.३ : आवश्यकतेनुसार काही कार्यक्रमासाठी वर्गणी जमा केली जाईल.
४.४ : कायद्यानुसार दरवर्षी आपल्या मंडळाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण सनदी लेखापाल यांचे कडून करण्यात येईल व अहवाल धर्मादाय आयुक्त यांचेकडे सादर करण्यात येईल.

५) हिशोबाचे आर्थिक वर्षं

५.१ : मंडळाचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते 31 मार्च असे राहील व वर लिहिल्याप्रमाणे वार्षिक हिशोब पत्रके तयार करून मंडळाने नेमलेल्या हिशेब तपासणीसांकडून मुदतीत तपासून घेण्यात येतील.

६) सभासदाचे सभासदत्व खालील कारणांमुळे संपुष्टात येईल.

६.१ : सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास.
६.२ : मानसिक विकृति, गंभीर स्वरुपाच्या फौजदारी गुन्ह्यात शिक्षा किंवा अशाप्रकारची अपात्रता निर्माण झाल्यास.
६.३ : वर्गणीचे संदर्भात थकबाकीदार झाल्यास.
६.४ : सभासदाने आपले सभासदत्व संपुष्टात आणण्याबद्दल लेखी विनंती केल्यास.
६.५ : नियमभंग अथवा गैरकृत्य असेल तर कार्यकारिणी विशेष अधिकाराने सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवते.

७) कार्यक्रम

स्नेहवर्धनासाठी मंडळाचे खालील प्रमाणे कार्यक्रम घेतले जातील.
१. वार्षिक स्नेह-संमेलन
२. कोजागिरी मिलन
३. दिवाळी फराळ
४. संक्रात - तिळगुळ व हळदीकुंकू



८) सभासद व देणगी प्रकार

८.१ : वार्षिक सभासद शुल्क (Yearly Membership fee) – (रक्कम रु ५००/-) - या निधीद्वारे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध उत्सव कार्यक्रम, विशेष व्यक्तींचा सन्मान, विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस/ पारितोषिके इत्यादीसाठी करण्यात येईल.
८.२ : कायम खास निधी (Donation)–(रक्कम रु १०१/- व अधिक)- यामध्ये आश्रयदाते यांचेकडून आलेल्या व मंडळास 101 रुपयावरील मिळालेली देणगी याचा समावेश असेल. तसेच शिल्लक रकमेपैकी कार्यकारी मंडळांनी वर्ग करण्यास मान्यता दिलेल्या रकमेचा या निधीमध्ये समावेश असेल. या निधीची उभारणी मंडळाच्या आर्थिक स्थैर्यासाठी असल्यामुळे समाविष्ट केलेल्या रकमांच्या विनियोग महत्त्वाच्या कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही.
८.३ : आजीव सभासद निधी (Life Membership Fund) –(रक्कम रु २५००/- व अधिक) - या निधीमध्ये आजीव सभासद वर्गणीचा समावेश होईल. या रकमांची गुंतवणूक करुन त्यामधून येणार्‍या व्याजाचा विनियोग मंडळच्या नित्य व दैनंदिन खर्चासाठी करता येईल.
८.४ : सशर्त देणगी निधी (Conditional Endowment Fund) – (रक्कम रु ५०००/- व अधिक) - सशर्त देणग्यांच्या निधीमध्ये विशिष्ट अटींवर मिळालेल्या देणग्यांचा समावेश होईल. अशा प्रकारच्या देणग्या मंडळच्या ध्येय व उद्देशास धरुन असलेल्या कार्याकरिताच स्वीकारण्यात येतील. या निधीचा उपयोग ज्या कारणांसाठी अथवा उद्देशांसाठी देणग्या स्वीकारल्या असतील त्यासाठीच करण्यात येईल.